आमदार बबनराव पाचपुते यांची घेतली घनश्याम शेलार यांनी भेट... तब्बेतीची विचारपूस...

​अमर छत्तीसे
श्रीगोंदा ः राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचे असते. व्यक्तीगत जीवनात व संबंधात ते आणायचे नसते. निवडणुका झाल्या की कोणी कोणाचा विरोधक नसतो. कोणी कोणाचा स्पर्धक नसतो. हेच जणू घनश्याम शेलार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलेले आहे. त्यांनी आमदार बबनराव पाचपुते यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.
 

श्रीगोंदा तालुक्यात सध्या प्रमुख राजकीय विरोधक म्हणून राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार व आमदार बबनराव पाचपुते हेच दिसून येतात.  गत विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते व घनश्याम शेलार आमचे सामने उभे राहिलेले होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत दोघांनीही एकमेकांवर टीका-टिपन्नी करून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते.   
या विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते यांचा विजय झालेला असून घनश्याम शेलार यांना पराभव पतकारावा लागलेला आहे. परंतु हा पराभव त्यांनी स्वीकारत. निवडणुकील एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप निवडणुकीपुरतेच मर्यादीत ठेवले आहेत. हे घनश्याम शेलार यांच्या कृतीतून दिसून येत आहे.  
 

गेल्या काही दिवसांपासून आमदार बबनराव पाचपुते आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती ठिक झाल्यानंतर आता ते श्रीगोंद्यात आलेले आहेत. रोजच त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्या प्रकृतीची खालीखुशाली विचारण्यासाठी तालुक्यातील अनेकजण येऊन जात आहेत.  
 
मात्र आज चक्क विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधी उभे राहिलेले घनश्याम शेलार यांनी काष्टीत येऊन आमदार बबनराव पाचपुते यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. घनश्याम शेलार यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.
 
या आजच्या भेटीतून राजकीय मतभेद असावे पण व्यक्तीगत सुख दुखात जाणे महत्त्वाचे असते असा संदेश मिळाला आहे. अशाच प्रकारचे राजकारण गावपातळीवरील कार्यकर्तांनी केले पाहिजे पण गावपातळीवरील कार्यकर्ता आपल्या निवडणुकीतील विरोधकाला आयुष्यभराचा विरोधक समजून त्याच्या विरोधात डावपेच आखत असतो. त्याला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करत असतो. निवडणुकीतील विरोधक हा निवडणुकीपुरताच ठेऊन नंतरच्या जीवनात मित्र बनविल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होऊन गावाचा विकास साधण्यास मदत होते.

आमदार बबनराव पाचपुते व घनश्याम शेलार यांच्या भेट झाली. त्यावेळी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील भोसले, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अॅड. विठ्ठलराव काकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, सतीष जामदार, जालिंदर पाचपुते आदी उपस्थित होते.
 
 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post