सोलापूर : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांची तर उपाध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची पुढील तीन वर्षांकरिता सर्वानुमते निवड झाली आहे.
'विस्मा' ही महाराष्ट्रातील खासगी साखर कारखान्यांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची 2021-2024 या कालावधीकरिता त्रैवार्षिक निवडणूक झाली. यामध्ये 11 सदस्य बिनविरोध निवडून आले.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने विस्माच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व महासचिव पदाच्या सर्वानुमते निवडी केल्या.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने साखर उद्योगातील तज्ज्ञ म्हणून आमदार हरिभाऊ बागडे व रेणुका शुगर्सचे अध्यक्ष रवी गुप्ता यांनी एकमताने निवड केली आहे.
या संघटनेच्या महासचिवपदी श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना संधी मिळाली आहे.
Post a Comment