पुण्यात पुन्हा मुसळधार बरसला...

पुणे : मुसळधार पावासाने पुणे शहरात पुन्हा एकदा हाहाकार उडाला आहे. पुण्याच्या पूर्व भागात दोन तासांपेक्षा जास्त वेळ पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चाकरमानी तसेच नागरिकांचे प्रचंड हाल झाले.


धानोरीत येथे सखल भागात पाणी साचले तर वाकडेवाडी, ताडीवाला रस्ता येथे वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली.पुण्यात चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे रस्ते, नाले तुडूंब भरले होते. आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. 

मुसळधार पवासामुळे धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे येथे इमारतीच्या पार्किंपर्यंत पाणी आले. ढगांच्या गडगडाटासह आज पुण्यात पाऊस बरसला.

पुणे शहरात पावसामुळे बरसल्यामुळे येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती आदी ठिकाणी पाणी साचले.  वाकडेवाडी, ताडीवाला रस्ता, वाडिया कॉलेज, येरवडा येथे वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. 

तसेच पिसोळी ग्रामपंचायतजवळ वीज पडून आग लागल्याचा प्रकार समोर आला. घटनास्थळी घराबाहेरील मीटर बॉक्सने पेट घेतला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने दाखल होत आग विझवली. घराशेजारील इलेक्ट्रिक पोलवर वीज कोसळून पुढे लगेचच मीटर बॉक्सने पेट घेतला.

पुण्यासोबतच महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. वसई विरार नालासोपाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या भागात संध्याकाळी आकाश पूर्णपणे भरून आले होते. 

त्यानंतर विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. तसेच राज्यात पुढचे तीन ते चार दिवसात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह  मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post