कोरोना काळात आरोग्य विभागाने केलेले काम उल्लेखनीय... आढळगाव गटाच्या सदस्यांच्या कामाचे कौतुक

 अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी व आशा  सेविकांनी केलेल्या कामाचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे.  आता नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लसीकरणाबरोबरच सर्वांनी एक झाड लावले पाहिजे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते यांनी केले. 


आढळगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य पंचशिला गिरकर यांच्या संकल्पनेतून आढळगाव जिल्हा परिषद गट पूर्ण कोरोना मुक्त व १०० टक्के लसीकरण करण्याचा संकल्प केला. आज आढळगाव येथे माझा गट १०० टक्के लसीकरण करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.

पाचपुते म्हणाल्या की, जिल्हा परिषद सदस्य पंचशिला गिरकर यांनी आपला स्वतः चा गट कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. या गटातील २२ गावातील फक्त साडेसहा हजार व्यक्ती करण्याचे बाकी आहेत. ते लसीकरण नक्कीच पूर्ण होईल.  त्याचबरोबर लसीकरण करु नका. अशा लोकांना धडा शिकवणे गरजेचे आहे.  

जिल्हा परिषद सदस्य गिरमकर म्हणाल्या की, राज्य सरकारने सुरुवातीला सांगितले होते माझे कुटुंब माझी जबाबदारी असे सांगितले होते. पण माझा गट माझा प्रभाग माझी जबाबदारी ही मोहिम राबवून आढळगाव जिल्हा परिषद गट १०० टक्के लसीकरण करण्यात येणार आहे, असे  गिरमकर म्हणाल्या. 

तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले ही मोहीम राज्यात आदर्श ठरणार आहे. या मोहिमेत महसूल विभाग सक्रिय राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर, सरपंच बंटी उबाळेपत्रकार उत्तम राऊत, रुग्ण कल्याण समितीच्या सदस्या रोहिणी शिंदे, अमर छत्तीसे, रमेश गिरमकर मित्र मंडळाचे संतोष सोनवणे, सतिश काळे. सतीश सुद्रीक, संदिप सूर्यवंशी, बाळासाहेब शिंदे, बापू जाधव आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी तर  डॉ. पल्लवी औटी यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post