बाॅलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर

मुंबई  ः बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्याची मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वत: एका महिला अधिकाऱ्यासोबत गुरुवारी आणि शुक्रवारी चौकशी केली होती. 


अनन्याच्या चौकशीत पुरेशी माहिती मिळालेली नसल्याने तिला पुन्हा सोमवारी सकाळी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, अनन्या चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात गैरहजर राहिली. आता तिला एनसीबीकडून पुन्हा नोटीस जातेय काय? हे आता पाहावे लागेल.

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरू असल्याचे उघडकीस आले होते. याठिकाणाहून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले होते. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. 

मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हॉट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचेदेखील नाव आहे. आर्यन खान व अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post