अल्पवयीन मुलींची वाढलेली प्रेमप्रकरणे आणि त्यासंबंधी गुन्ह्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक....

श्रीगोंदा : अल्पवयीन मुलींची वाढलेली प्रेमप्रकरणे आणि यासंबंधी गुन्ह्यांची वाढलेली संख्या चिंताजनक आहे. शाळा हे संस्कार केंद्रे आहे. शिक्षकांनी शाळकरी मुलांच्या समुपदेशनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. पालकांनी मुलांना वेळ देऊन योग्य संस्कार करावेत असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश वर्ग १ मुजीब एस. शेख यांनी केले. 


आझादी का सुवर्ण महोत्सव ' या अभियानांतर्गत तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिर आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथे आयोजित केले होते. यावेळी वकील संघाच्या पदाधिका-यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा न्यायाधीश शेख म्हणाले की, विभक्त कुटुंब पद्धतीचा फटका सध्याच्या पिढीला बसला आहे. आजी आजोबांच्या संस्काराला ही पिढी मुकली आहे, त्यामुळे संस्काराअभावी जबाबदारीची जाणीव होत नसल्यामुळे अल्पवयीन मुला मुलींच्या विषयी गुन्हे वाढत आहेत. 

शिक्षकांनी पुस्तकाबरोबरच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. सर्व पर्याय संपल्यानंतरच न्यायालयात आले पाहिजे. यावेळी जिल्हा न्यायाधीश वर्ग २ एन.जी. शुक्ल यांनी बालकांचे लैंगिक अत्याचार आणि कायदे याविषयावर सविस्तर विवेचन केले. 

बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी तसेच बालहक्काच्या संरक्षणासाठी कायदा कडक असल्याचे सांगितले. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. जी. जाधव यांनी महिलांविषयी कायद्यांची माहिती दिली. ॲड. महेश लगड यांनी यावेळी रस्ते वहिवाटीच्या हक्कांची माहिती दिली. 

यावेळी पोलिस उपनिरीक्षक विठ्ठलराव पाटील यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post