उसने पैसे मागितल्याचा राग आल्याने महिलेस मारहाण

राहुरी ः उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने राहुरी शहरातील एका महिलेस बेदम मारहाण केल्याची घटना राहुरी येथे घडली. या घटेमुळे खळबळ उडाली आहे.


याबाबतची माहिती अशी की गीता भगवान गुंजाळ (वय 45 वर्षे, राहणार राहुरी खुर्द) यांनी  काहीं दिवसांपूर्वी नितीन दौलत साळवे (राहणार राजवाडा,राहुरी) याला 25 हजार रुपये हातउसने म्हणून दिले होते.

त्यानंतर गुंजाळ यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी साळवे यांच्याकडे दिलेले उसने पैसे मागितले. परंतु साळवे याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेच्यादरम्यान शहरातील कोहकडे हॉस्पिटल समोर असताना नितीन साळवे हा तेथे दारू पिऊन आला.

तो म्हणाला, मला दिलेले 25 हजार रुपये परत का मागते? असे म्हणून तो शिवीगाळ करू लागला. त्यावेळी गीता गुंजाळ त्याला म्हणाल्या की, तू मला शिवीगाळ करू नकोस. ही माझी कष्टाची कमाई आहे. तुला गरज असताना मी तुला पैशाची मदत केली होती.

आता मला पैशाची गरज असल्याने तू मला माझे उसने दिलेले पैसे परत दे, असे म्हटले. याचा राग येऊन नितीन साळवे याने गीता गुंजाळ यांच्या डोक्यात वीट मारून जखमी केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.

या घटनेनंतर गीता गुंजाळ यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नितीन साळवे याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पुढील कारवाई राहुरी पोलिस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post