आढळगाव सेवा संस्थेकडून १५ टक्के लाभांश वाटप

श्रीगोंदा : येथील सेवा सहकारी संस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्यात येत आहे. जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी लाभांश वाटप सुरु करण्यात आले. 


संस्थेच्या लाभांश वाटपाच्या निर्णयाबद्दल सभासदांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सभासदांच्या सहकार्याने आढळगाव सेवा संस्थेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३३ लाख ६९ हजार दोनशे रुपये नफा झाला.१ कोटी ११ लाख एकोनतीस हजार रुपयांचे सभासद समभाग जमा आहे.

त्याच्या १५ टक्के सुमारे १६ लाख ६९ हजार रुपयांचे लाभांश वाटप होत असून एक हजार सातशे सत्तेचाळीस सभासदांना लाभ मिळणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप यांच्या उपस्थितीमध्ये आढळगाव सेवा संस्थेच्या लाभांश वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम गदादे, उपाध्यक्ष मोहन काळाणे, ज्येष्ठ नेते सुभाषलाल गांधी, जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी वसंत जामदार, शाखाधिकारी गोपाळ पवार, माजी सभापती विलास भैलुमे, संस्थेचे माजी अध्यक्ष नानाभाऊ बोळगे, सरपंच शिवप्रसाद उबाळे, ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव राऊत, महादू वाकडे, सचिव मुकींदा शिंदे, संचालक तात्याबा डोके, सोपाना गव्हाणे, बाजीराव गव्हाणे, दत्ता चव्हाण, संजय गाढवे यांच्यासह हौसराव गव्हाणे, संतोष गव्हाणे, अशोक शिंदे, संदिप वडवकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post