नवोदीत कवींनी काव्य लेखनाअगोदर चिंतन करावे....

पारनेर : नवोदीत कवींनी काव्य लेखन करण्याअगोदर मनन चिंतन जरुर करावे. त्यामुळे दर्जेदार व ताकदवार साहित्य कागदावर उतरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक कवी समिक्षक संजय पठाडे यांनी केले . 


ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत वाघ यांच्या संक्लपनेतून सुपा येथे काव्य मैफिलीचे आयोजन केले होते. त्यावेळी संजय पठाडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री प्रशांत वाघ यानी केले. 

कवी ओमप्रकाश देंडगे यांनी " अनाथाची दिवाळी " ही कविता सादर करून  वास्तवाचे दीप पाजळले तर त्याच्या " पावसाची आठवण करून देणाऱ्या कवितेने पुन्हा श्रावण सरीची आठवण करुन दिली. 

अमोल सोनवणे यांच्या " शोध स्वताचा "या कवीने  अंतर्मनाचा आरसा दाखवला तर त्याची दुसरी कवीता " निर्भया" ने कोपर्डी, लोणीमावळा व आताच्या जवळा घटनाची आठवण करुन दिली. कानिफ गायकवाड यांनी कोरोनावर कविता करत अनुभवाचे बोव विषद केले. 

ज्येष्ठ लेखक कारभारी बाबर यांनी वास्तव्य जीवनाशी कविता सादर करत  मैफीलीत उत्तोरतर रंग भरवीत नेले. संजय पठाडे यांनी एक शे बढकर एक कवीता गजल सादर केल्या. यात 

पाहिले मी मोगर्याची रास होताना तुला

पाहिले मी तुला चंदनाचा वास होताना तुला

मोडलेले खोपटे पेटलेली भुकही 

पाहिले मी त्या पिलाचा घास होताना .

रोज आत्याचार होती भोवताली सारखे  पाहिले मी सोसण्याचा ञास होताना तुला 

अशा बहारदार कवीतांनी मैफील रंगत गेली.

कवी सुनिल सोंडकर यानी अप्रतिम रचना सादर करून दुधात साखर टाकण्याचे काम केले. आयोजक कवी यांनी सुमधूर स्वरात कोरोनावर लावनी सादर करत दुधाची खीर बनवली.

सुरेंद्र शिंदे यांनी ही आपल्या शब्दातून उपस्थिताना सह्याद्रीची सफर घडवली . यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विजय लोढे यांनी पूणे येथून मैफिलीत सहभाग घेत आपल्या रचना सादर केल्या. तसेच सर्वच कवीतावर विवचन करत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ बहारदार कवी संजय ओहळ ( देवा) यांनी बहारदार सर्व प्रकारच्या रचना सादर करत. चढत्या राञीत स्वराचे रंग भरले तर त्याच्या फेर धरन्याच्या रचनेने सर्व उपस्थितीताना ठेका धरण्यास भाग पाडले.

प्रत्येक कवीतेनंतर शेरोशायरी करत संजय ओहळ यांनी अप्रतिम सूत्रसंचलन केले यावेळी वैभव पठारे यांनी ही सहभाग घेतला. ऐकाहून एक सरस रचना सादर करत उपस्थित कवीनी दीपावली अगोदरच शब्दाचे फटाके फैडले. कवी अमोल सोनवणे यांनी काव्य सुरात आभार मानले.

बोचर्या थंडीत  एका वरचढ एक रचनानी काव्य मैफिल उत्तोरोतर रंगत गेली .ज्येष्ठ साहित्यिक विजय लोढे यांनी उपक्रमाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post