भुवनेश्वर : रेल्वे उलट्या दिशेने धावतेय हे ऐकले तर कोणाचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण संपर्क क्रांती एक्स्प्रेस नुकतीच धावली आहे.
त्याचे असे झाले...मंगळवारी रात्री संपर्क क्रांती एक्स्प्रेस टाटानगरहून भुवनेश्वरकडे निघाली होती. त्याच दरम्यान अचानक एका महिलेला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. काय करावे हे कोणालाचे कळत नव्हते. परिस्थितीचे गांभिर्य बघून ट्रेन उलट्या दिशेने चालवावी असा निर्णय घेण्यात आला. एक नव्हे तर तब्बल तीन किलोमीटर रेल्वे उलट्या दिशेने चालविण्यात आली.
भारतीय रेल्वेने आतापर्यंत अनेक आदर्श ठेवले आहेत. मंगळवारी भारतीय रेल्वेने मानवतेचा धर्म निभावला आहे.
रेल्वेने प्रसूती होत आसलेल्या महिलेसाठी तीन किलोमीटर विरुद्ध दिशेने ट्रेन चालवली आहे. याची इतिहासात एक नोंद झाली आहे.
Post a Comment