मॉस्को : रशियामध्ये कोरोना वायरसचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. मागील काही दिवसांपासून रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी मृत्यूंच्या दैनिक संख्या दुसरा उच्चांक गाठला आहे.
कोविड संक्रमणाच्या वाढीमुळे रशिया सरकारने या आठवड्यापासून बहुतेक रशियन लोकांना काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रशियाच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सने, मंगळवारी 24 तासांत 1106 मृत्यूची नोंद केली आहे. हा मृत्यूचा आकडा रशियामध्ये कोविड महामारी सुरुवात झाल्यापासूनचा सर्वात जास्त आहे.
रशियामध्ये एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन लाख 32 हजार 775 वर पोहचली आहे. जी युरोपमधील आतापर्यंतची सर्वात मोठी आहे.
व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 30 ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत काम न करण्याचा आदेश देऊन सुट्टी जाहीर केली आहे.
Post a Comment