संगमनेर, राहुरी, राहात्यात चिंता कायम

नगर ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी जास्त होत आहे. दिवसभरात 415 बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये संगमनेर, राहुरी, राहात्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत.


कोरोनाचा आकडा सध्या कमी जास्त होत असला तरी आज मात्र बाधितांच्या आकड्यात वाढ झालेली आहे. गुरुवारी 415 जण बाधित आढळून आलेले होते. 

जिल्हा रुग्णलयाच्या तपासणी अहवालात 123, खासगी तपासणीत 164 तर रॅपिड चाचणीत 128 जण बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यात  सर्वाधिक 53 रुग्ण बाधित आढळून आलेले आहेत.  

दुसर्यास्थानी आज राहुरी तालुक्याने झेप घेतलेली आहे. राहुरीमध्ये 40 बाधित आढळून आलेले आहे. तिसर्यास्थानी राहाता तालुका असून राहात्यामध्ये 80 जण बाधित आढळून आलेले आहेत. नगर शहरात 22 बाधित आढळून आलेले आहेत. 

आज गुरुवारपासून राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आलेली असली तरी नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यात कोरोनाचा आकडा कमी जास्त होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post