जिल्ह्यातील बाजार समित्यांचा संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर

नगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला. हा निवडणूक कार्यक्रम संभाव्य असून यामध्ये 17 जानेवारी 2022ला मतदान होणार आहे.


नगर व पारनेर बाजार समिती वगळता इतर बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी आता सुरु झालेली आहे.

या बाजार समित्यांचा संभाव्य निवडणूक कार्यक्रमात 17 जानेवारीला मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार असल्याची म्हटलेले आहे. बाजार समित्यांचा संभाव्य निवडणूक कार्यक्रम असा आहे.  १० नोव्हेंबरला प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

१० ते २२ नोव्हेंबर दरम्यान प्रारूप यादीवर हरकती व आक्षेप मागवण्यात येणार आहे. 22 नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान  प्राप्त हरकती व आक्षेपांवर निर्णय घेण्यात येणार आहे.

सहा डिसेंबरला मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. 16 डिसेंबरला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करणार आहेत. 16 ते 22 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज विक्री, स्वीकृती करण्यात येणार आहे.

२३ डिसेंबरला दाखल अर्जांची अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. २४ डिसेंबरला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.२४ डिसेंबर २०२१ ते सात जानेवारी २०२२ दरम्यान अर्ज माघारी घेता येणार आहे.

दहा जानेवारीला निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १७ जानेवारीला मतदान होणार आहे. १८ जानेवारीला  मतमोजणी होणार आहे.

हा निवडणूक कार्यक्रम संभाव्य आहे. यामध्ये ऐनवेळी बदल होण्याची शक्यता आहे. या संभाव्य कार्यक्रमात उमेदवारांना प्रचारासाठी फक्त सहा दिवसांचा कालावधी मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post