नगर ः कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी कमी झाली होती. शंभरच्या आत रुग्ण संख्या आल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र आज सर्वांच्याच मनात धडकी भरली आहे. कालच्या पेक्षा आज तब्बल 107 रुग्णांत वाढ झालेली आहे. त्यामुळे कोरोना अद्याप गेलेला नाही, असेच यावरून स्पष्ट होत आहे.
सोमवारी (ता. 25) जिल्ह्यात कोरोना बाधितांची आकडेवारी 97 आली होती. त्यामुळे सर्वांनाच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे वाटत होते. मात्र आज त्यात तब्बल 103 रुग्णांची वाढ झालेली आहे.
जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आता होत आहे.
जिल्ह्यात कर्जत व पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहे. या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी 24 रुग्ण सापडलेले आहेत. दुसर्यास्थानी राहाता तालुका असून राहाता तालुक्यात तब्बल 17 जण बाधित आढळून आलेले आहेत. तिसऱ्या स्थानी नगर व राहुरी तालुका असून या दोन्ही तालु्क्यात प्रत्येकी 16 रुग्ण आढळून आलेेले आहेत. नगर शहरातही रुग्णांच्या संख्येत आज वाढ झालेली आहे. नगरमध्ये एकूण 12 जण बाधित आढळलेले आहेत.
Post a Comment