नगर ः अमेरिकेत राहून भारतात परतलेल्या एका व्यक्तीने विम्याचे पैसे हडपण्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव रचला आहे. त्यासाठी आरोपीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने एका भोळसर, मनोरुग्ण व्यक्तीेचे अपहरण करून त्याला सापाचा दंश घडवून त्याची हत्या केली.
त्यानंतर आरोपीने संबंधित मृतदेह स्वत:चा असल्याची कागदपत्रे तयार करून विमा हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळे आरोपीचा प्लॅन फसला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपीसह त्याच्या पाच साथीदारांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत.
प्रभाकर वाकचौरे (कळस), हर्षद रघुनाथ लहामगे (राजूर), प्रशांत रामहरी चौधरी (धामणगाव), संदीप सुदाम तळेकर (पैठण) व हरीश रामनाथ कुलाळ (कोंदणी) असं अटक केल्या पाच आरोपींची नावे आहेत.
मुख्य आरोपी प्रभाकर वाकचौरे हा 20 वर्षे अमेरिकेत राहून काही दिवसांपूर्वी मायदेशी भारतात परतला होता.
दरम्यान, अमेरिकेत वास्तव्याला असताना आरोपीने एका अमेरिकन विमा कंपनीत 15 लाख डॉलरचा विमा उतरवला होता. गावी आल्यानंतर आरोपीने स्वत:च्या नावावरील विमा हडपण्यासाठी खुनी खेळ केला आहे.
Post a Comment