अमर छत्तीसे
श्रीगोंदा ः गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा
तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजेरी लावलेली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंंचनामे त्वरीत करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते
संभाजी देविकर यांनी केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात देविकर यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका येळपणे जिल्हा परिषद गटातील बहुतांशी गावांना बसला आहे. या भागातील कांदा, मका, ज्वारी आदी पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने अतिवृष्टी झालेल्या गावातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत
द्यावी, अशी येळपणे जिल्हा परिषद गटाचे युवा नेते संभाजी देविकर यांनी केली
आहे.
शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर त्यांची आर्थिक स्थिती खालावण्याची भीतीही देविकर यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने नुकसान भरपाईचे पैसे जमा करणे गरजेचे आहे, असेही देविकर यांनी या निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment