नेप्तीत कांद्याला इतका भाव

नगर ः दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याची सुमारे 44 हजार गोण्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्याला 3200 रुपयांचा भाव मिळाला.


नेप्ती उपबाजार समितीत शनिवारी कांद्याच्या 44 हजार 119 कांदा  गोण्यांची आवक झाली होती. त्यामध्ये कांद्याला सुमारे 3200 रुपयांचा भाव मिळाला आहे.  

कांद्याचे  प्रतवारीनुसार भाव - एक नंबर कांदा ः 2600 ते 3200, दोन नंबर कांदा ः 1800 ते 2600, तीन नंबर कांदा ः 900 ते 1800, चार नंबर कांदा ः 500 ते 900.

लाल कांद्याच्या दहा हजार 178 गोण्यांची  आवक झाली. यामध्ये कांद्याला सर्वाधिक भाव 2300 रुपयांचा मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1800 ते 2300, दोन नंबर कांदा ः 900 ते 1800, तीन नंबर कांदा ः 300 ते 900, चार नंबर कांदा ः 100 ते 300. 

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post