श्रीरामपूरमध्ये या गावात प्रशासनाकडून करड निर्बंध


श्रीरामपूर :
कोरोनाचा कहर आता कमी होण्याऐवजी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आता प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली कडक केलेली आहे. तशीच नियमावली सात दिवसांसाठी आता श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात करण्यात आलेली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द परिसरात कोरोना संसर्ग वाढल्याने पुढील सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक कोरोना समितीने घेतला आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग टप्याटप्याने वाढत आहे. 
 
तालुक्यातील कारेगाव परिसरात ३० तर बेलापुर खुर्द परिसरात १५ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाकडुन दोन्ही गावात कंटेनमेंट झोन घोषीत केला आहे. गुरुवारी दिवसभरात तालुक्यात २६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या २०० हून अधिक झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा संर्सग वाढत असल्याने कोविड रँपीड अॅन्टिजन तपासणी वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. तसेच अॅक्टिव रुग्ण असलेल्या परिसरात विशेष खबरदारी घेतली. जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. देविदास चोखर यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post