रावसाहेब रोहोकले गुरूजी यांची राज्यनेतेपदी निवड

नगर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या पनवेल येथे दोन व तीन ऑक्टोबरला झालेल्या पदाधिकारी राज्यस्तरीय आढावा बैठकीत शिक्षक परिषदेचे संस्थापक माननीय आमदार संजय केळकर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या नेतेपदी रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या नावाची घोषणा केली. 


याप्रसंगी राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह सुधाकर म्हस्के, राज्य कोषाध्यक्ष संजय पगार, राज्य कार्याध्यक्ष  मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, राज्य संघटन मंत्री मधुकर दंडवते, राज्य सहकार्यवाह पुरषोत्तम काळे, प्रकाश चुनारकर, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, डॉ.सत्पाल सोवळे, अविनाश तालापल्लीवार, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाय आदी उपस्थित होते. 

प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय संघटनेच्या  राज्य नेतेपदाच्या संधीचा बहुमान मिळालेले रावसाहेब रोहोकले गुरूजी हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिले शिक्षक नेते आहेत. 

सातत्याने प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणूकरिता मंत्रालयाबरोबरच , शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण संचालक कार्यालय व जिल्हा परिषदेत रोहोकले गुरूजींचा सतत पाठपुरावा चालू असतो. 

नोकरीच्या सुरूवातीपासूनच शिक्षक संघाच्या माध्यमातून कामास सुरूवात केलेल्या रोहोकले गुरूजींची दोन वर्षापूर्वी संघाच्या राज्य नेतृत्वाने अवहेलना करत जिल्ह्यतील शिक्षकांना उगवत्या सूर्याला नमस्कार करा असा सूचक इशारा देेत आता गुरूजी तुम्ही बाजूला व्हा, असे सांगण्याचा प्रयत्न केला होता. एव्हढ्यावर न थांबता राज्य नेतृत्वाने शिक्षक बँकेत थेट हस्तक्षेप करत सत्ता परिवर्तनात महत्वाची भूमिका पार पाडली होती. 

जिल्ह्यातील रोहोकले गुरूजींच्या निष्ठावंत समर्थकांमध्ये या प्रकारामुळे राज्यनेतृत्वा विषयी कमालीचा रोष निर्माण झाला होता. त्याच रोषातून गुरूजी समर्थकांनी राज्य संघ सोडण्याकरिता गुरूजींवर दबाव निर्माण करून संघ सोडायला भाग पाडून परिषदेत प्रवेश केला होता. 

मागील तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या राज्यातील २७ जिल्ह्यात कार्यकारण्या आहेत. राष्टहित, समाजहित, विद्यार्थीहित व शिक्षकहित या चतुसुत्रीवर आमदार संजय केळकर यांनी स्थापन केलेल्या या संघटनेच्या माध्यमातून राजाध्यक्ष राजेश सुर्वे हे अत्यंत अभ्यासूपणे विविध स्तरावर प्रश्नांची सोडवणूक करत आहेत.

आता रोहोकले गुरूजी यांच्या सारख्या अनुभवी नेत्याच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे संघटनेला नवीन उर्जा मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या सुखदु:खात सतत सहभागी होऊन त्यांचे विविध प्रश्न धसास लावणा-या गुरूजींचा शिक्षक परिषदेने राज्य नेतेपदी निवड करून ख-या अर्थाने एका कर्मयोगी शिक्षक नेत्याचा सन्मान करत राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवेची संधी निर्माण करून दिली आहे. जिल्ह्यातील शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post