नगर
ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत सत्ता बदल झाल्यापासून राजकारणाचे चक्रे
आता फिरू लागलेले आहे. एकमेकांच्या विरोधकांना एकत्र करून आगामी निवडणुकीचे
डावपेच टाकण्यास आता सुरवात झालेली आहे. बॅंकेतील एका गटाने आपल्या विरोधी
गटाशी हातमिळवणी करण्यासाठी पाऊले उचलल्याची चर्चा सध्या सुरु झालेली आहे.
जिल्हा
प्राथमिक शिक्षक बॅंकेतील सत्ता बापू तांबे यांच्या गटाकडून काढून रोहकले
गटाने आपल्या ताब्यात मिळविण्यात यश मिळालेले आहे. त्याचा फायदा आगामी
निवडणुकीत रोहकले गटाला होईल, असा कयास बांधला जात आहे. तसेच सत्ता असताना
आपण केलेली कामाच्या बळावर सभासद मतदार आपल्याला साथ देतील, असा विश्वास
बापूसाहेब तांबे गटाकडून व्यक्त केला जात आहे.
दोन्ही गट
एकमेकांना शहकाट शह देण्यात सध्या व्यस्त आहेत. मात्र विरोधकांनी या दोन्ही
गटाला शहकाटशह देण्यासाठी आपले डावपेच टाकण्यास सुरुवात केलेली असून आगामी
निवडणुकीची तयारी सुरु केलेली आहे. या दोन्हीच्या भांडणात मात्र विरोधी
गटांना होणार असल्याचे सध्याच्या चित्रावरून दिसून येत आहे. मतदारही
बॅंकेतील राजकारणाला आता कंटाळलेले असून यांच्या पेक्षा दुसरे बरे असे
म्हणायला लागलेले आहे.
बॅंकेतील सत्ता बदल झाल्यापासून
शिक्षकांमधील राजकारण आता तापलेले आहेत. गुरुमाऊलीच्या एका गटाने आता
विरोधकांशी बोलणी करून आगामी निवडणुकीत युती-आघाडी करण्याच्या हालचाली सुरु
केल्या असल्याची चर्चा सुरु झालेली आहे. त्यामुळे गुरुमाऊलीचा नेमका कोणता
गट कोणत्या विरोधी गटाशी हातमिळवणी करतो, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात
आहेत. या विषयी मात्र मतदार सभासदांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Post a Comment