जळगाव : एसटी कामगारांचा संप चिरघळताना दिसून येत आहे. संपाची मुदत संपून देखील कामावर न येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. जळगाव विभागामध्ये 22 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव आगारातील 8 तर भुसावळ आगारातील 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात एस.टी. कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाकडून कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बस कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटीची सेवा ठप्प झाली आहे.
कारवाईच्या इशाऱ्यानंतर जळगाव आगारातील 35 चालक आणि 35 वाहक कामावर रुजू झाले असून, काही मार्गावरील बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जळगाव विभागातील एकूण 350 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरी देखील अद्यापही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
Post a Comment