मुंबई : रोहित शर्माची भारतीय एकदिवसीय व टी 20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. रोहितला मात्र यानंतर दुखापतीने ग्रासले. यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे.
हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रोहितला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. रोहित शर्मा आफ्रिका विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेमध्ये खेळणार की नाही.
रोहित दुखापतीतून सावरताना दिसत आहे. तो हळूहळू फिट होतो. रोहित पहिल्या फिटनेस टेस्टमध्येही यशस्वीरित्या पास झाला
आहे. टीम इंडियासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
आहे. टीम इंडियासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
मुंबईत आफ्रिका दौऱ्याआधी सरावादरम्यान थ्रो डाऊन स्पेशालिस्ट राघवेंद्र आणि रोहित शर्मा सराव करत होते. या दरम्यान रोहितला दुखापत झाली होती.
यानंतर रोहितला हॅमस्ट्रिंगचा त्रास असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं. यामुळे रोहितला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. रोहितच्या जागी गुजरातच्या प्रियांक पांचाळला संधी देण्यात आली.
Post a Comment