ओमायक्रॉनचं संक्रमण वाढल...

मुंबई :  दिल्लीत पुन्हा एकदा ओमायक्रॉनच्यासंसर्गाची प्रकरणं वाढली आहेत. रविवारी दिल्लीत कोरोनाने गेल्या सहा महिन्यांचा विक्रम मोडला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 107 रुग्ण आढळले आहे. 


दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमणाच्या दरामध्ये वाढ होताना दिसतेय. पॉझिटीव्हीटी रेट 0.17 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यापूर्वी 25 जून 2021 ला एकाच दिवसात सर्वाधिक 115 कोरोना रुग्ण आढळले होते. 22 जून 2022 ला संसर्ग दर 0.19 टक्के होता. 

दिल्लीत 10 दिवसांनंतर कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 25,101 झाली आहे. दिल्लीत कोरोनाचे 500 हून अधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे आणखी 6 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, रविवारी भारतात प्रकरणांची संख्या 151 वर पोहोचली.  

आतापर्यंत महाराष्ट्रात 54, दिल्लीत 22, राजस्थानमध्ये 17, कर्नाटकात 14, तेलंगणात 20, केरळमध्ये 11, गुजरातमध्ये 9, आंध्र प्रदेशात 1, चंदीगडमध्ये 1, तामिळनाडूमध्ये 1 आणि पश्चिम बंगालमध्ये ओमायक्रॉनची 1 प्रकरणे आढळली आहे.त्यामुळे आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post