जिल्हा परिषद पतसंस्थेवर जय गणेश मंडळाचे निर्वावाद वर्चस्व

नगर ः  जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनलला धूळ चारत जय श्री गणेश पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.


जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या 21 जागांसाठी रविवारी मतदान पार पाडले. सुभाष कराळे यांच्या नेतृत्वाखाली श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनल व संजय कडूस यांच्या नेतृत्वाखाली जय श्री गणेश पॅनल यांच्या दुरंगी लढत झाली. आज (ता. 20) नगरमध्ये पटेल मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. निकाल जाहीर होताच श्री गणेश मंडळाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत व फटाक्यांची आतषबाजी करीत मोठा जल्लोष केला. 

जय श्री गणेश मंडळाचे निर्विवाद वर्चस्व उमेदवारनिहाय पडलेली मते  ः  संजय कडूस ः 1161,  प्रशांत  मोरे ः  1140, विक्रम सेस 1120, विलास शेळके ः 1280, अरुण जोर्वेकर ः 1371,  भाऊसाहेब चांदणे ः 1208,  राजू दिघे ः 1255, दिलीप डांगे ः 1160, चंद्रकांत संसारे ः 1141, ऋषिकेश बनकर ः 1312, स्वप्निल शिंदे ः 1285, ज्योती पवार ः 1271, कल्याण काळे ः 1254, सुधीर खेडकर ः 1225, श्रीकांत देशनाने 1194, काशिनाथ नरोडे ः 1170, कैलास डावरे ः 1020, योगेंद्र पालवे ः 1164, अर्जन मंडलिक 1151, सुरेखा महानूर ः 1192, मनीषा साळवे ः 1165.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post