ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले...

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेले दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मांडलेचा यांनी दिली आहे. 


एक 50 वर्षीय व्यक्ती लंडन वरून भारतात १४ डिसेंबरला आले होते. त्यांची मुलगी मुंबई येथे ओमायक्रॉन बाधित आढळून आली आहे. 

मुंबई येथे लीलावती रुग्णालयात तिला भरती केले. तिचे वडील व कुटुंबातील दुसरे सदस्य औरंगाबादला आले. सिल्वर इन हॉटेल येथे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. 

या दोघांची आरटीपीसीआर चाचणी केली असता यातील एकाच अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी  पाठवला. आज २५ डिसेंबरला एकाच ओमायक्रोन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. 

सदर रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्या सर्व सदस्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post