जळगाव : जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवळकर यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली असल्याची घटना घडली आहे.
रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली.
या दगडफेकीनंतर त्यांनी रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली.
हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात आवाज उठविला असल्याने त्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Post a Comment