नायजेरिया येथून आलेली ओमिक्राॅनबाधित महिला उपचारानंतर सुखरुप घरी परतली


श्रीरामपूर  ः नायजेरिया येथून श्रीरामपूरात आलेल्या ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेचा उपचारानंतर कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे महिलेसह तिच्या मुलालाघरी सोडण्यात आले आहे.

ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. रविवारी त्यांची पुन्हा ओमिक्राॅनची तपासणी केली. त्यात त्या महिलेसह सहा वर्षीय मुलाचा तपासणीचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात.आले आहे. 

ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. तसेच त्यांच्या कुटूंबातील इतर लोकांनी देखील कोरोना लसीकरण केलेले होते. त्यामुळे उपचार घेवून त्या लवकर बरया झाल्या. त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाइन ठेवण्यात येणार आहे.

सदर रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. प्रशासनाने मात्र खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post