उसाच्या शेतात बनावट दारुचा अड्डा...

पाथर्डी : तालुक्यातील जांभळी गावाच्या हद्दीत उसाच्या शेतामधे बनावट दारु तयार करण्याच्या कारखान्यावर पाथर्डी पोलिस व उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर यांच्या अधिका-यांनी छापा मारला.पोलिसांनी बनावट तयार केलेली दारु व दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहीत्य असा पाच लाख पंचवीस हजार आठशे एकोणपन्नास रुपयाचा माल जप्त केला आहे. 


बनावट दारु तयार करणारा विजय बाबुराव आव्हाड रा.जांभळी याच्या विरुद्ध महसुल बुडविणे,फसवणुक करणे,आरोग्याला बाधक द्रव्य तयार करुन विक्री करणे, व महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९५१ च्या कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पोलिस हवालदार अनिल बडे यांनी फिर्याद नोंदविली आहे.  

विजय आव्हाड यास ताब्यात घेतले आहे. आव्हाड याला याच प्रकारच्या गुन्ह्यात यापुवीही पोलिसांनी दोन वेळा अटक केलेली आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,रामेश्वर कायंदे, कौशल्यरामनिरंजन वाघ,पोलीस नाईक अनिल बडे,पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, राहुल तिकोने, अल्ताफ शेख, देवीदास तांदळे, सागर मोहिते,भारत अंगरखे, राजेंद्र सुदृक,महिला पो.कॉ.प्रतिभा नागरे,राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक बी.टी.घोरताळे, ए.बी.बनकर, एस बी विधाटे, कॉन्स्टेबल एन एस उके,यु.जी काळे, एस व्ही बिटके, महिलाकॉन्स्टेबल एस.आर.आठरे,महसुलचे विजय बेरड, सदानंद बारसे, देविदास फाजगे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी हि कारवाई यशस्वी केली.

विजय आव्हाड याच्या जांभळी गावातील घराशेजारीच उसाच्या शेतामधे बनावट दारु तयार करण्याचा कारखाना सुरु केला आहे.सकाळी दहा वाजता पोलिसांनी विजय आव्हाड याच्या बनावट दारु तयार करण्याच्या कारखान्यावर छापा मारला. तेथे सहाशे लिटर स्पिरीट,सुमारे पंधरा बँरल,दोन पाण्याच्या टाक्या, लेबल, स्क्रिनपेंटींगचे मशीन,बुच लावण्याचे मशीन, संत्रा, अपनाधार,भिंगरी व संजीवनी कपंनीचे बनावट लेबल, बारा हजार बुच, ८० गोण्या दारुच्या मौकळ्या बाटल्या, ८४ बनावट तयारकेलेल्या दारुचे बाँक्स असा  मोठा ऐवज पोलिसांना सापडला. 

तेथे दारु तयार करण्याचे साहीत्य व बनावट तयार केलेली दारु याचा मोठा साठा पोलिसांना मिळाला आहे. विजय आव्हाडही तेथेच पोलिसांना सापडला आहे.पोलिसांनी आव्हाड याला ताब्यात घेतले आहे. बनावट तयार केलेली दारु भरण्यासाठीच्या रिकाम्या बाटल्याचा साठाही मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.पोलिस अधिकारी व कर्मचारी  दोनतिन वाहनातुन सापडलेला दारुचा साठा व तयार करण्यासाठीचे लागणारे साहीत्य घेवुन पाथर्डी पोलिस ठाण्यात आले.

तेथे आव्हाड याच्यावर गुन्हा नोंदविला.आव्हाड याच्या विरुद्ध यापुर्वीही बनावट दारु तयार करण्याचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यामध्ये जामीनावर सुटल्यानंतर आव्हाड याने पुन्हा त्याचा व्यवसाय सुरु केल्याची माहीती पोलिसांना खब-यामार्फत मिळाली होती. 

आव्हाड याने राहत्या घराच्या जवळच दारु तयार करण्याचे काम सुरु केले होते.उसाच्या शेतामधे हा उद्योग सुरु होता. पोलिसांना छापा मारला तेव्हा तयार केलेला व बाँक्समध्ये भरलेला दारुचा साठा मिळाला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post