प्राध्यापकांवरील हल्ल्यातील आरोपी जेरबंद

अहिल्यानगर ः प्राध्यापकावर केल्लाय चाकू हल्ल्यातील दोन आरोपींना पकडण्यात आलेले आहे. ही उल्लेखनिय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली आहे


निखील विकास बोरकर (वय 34,रा.पुसद, ता.पुसद, जि.यवतमाळ) हे कुटुंबियांना भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे आले असताना सहा मे रोजी पहाटे पावणे चारच्या .सुमारास श्वसनाचा त्रास झाल्याने ते घराबाहेर आले. फिर्यादी हे रेल्वे स्टेशन रोड लोखंडी पुलावरून जात असताना तीन आरोपी मोपेडवरून येऊन त्यांनी फिर्यादीस आडवून खिसे तपासून पैस न मिळाल्याने फिर्यादीकडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने प्रतिकार केला. त्यावेळी आरोपींनी चाकूने त्यांच्या हातावर, पाठीवर वार करून पळून गेले.

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरी प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा तपास त्वरित लावून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी होत होती.  या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहीद शेख, विजय ठोंबरे, रोहित येमुल, रोहित मिसाळ, मयुर गायकवाड, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड अशांचे पथक नेमूण गुन्हा उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

नऊ मे रोजी पथक कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा प्रवीण राजू चांदणे, रा.सिध्दार्थनगर, अहिल्यानगर याने त्याचे दोन साथीदारासह केला आहे. ते सध्या सिध्दार्थनगर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकातील पोलीस अंमलदारांनी सिध्दार्थनगर येथे जाऊन संशयीतांचा शोध घेऊन ते मोपेड गाडीवर असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत असताना एक आरोपी पळून गेला.  

प्रविण राजु चांदणे (वय 19 2) राहुल राजू भोसले (वय 20, दोन्ही रा.सारडा कॉलेजमागे, सिध्दार्थनगर, अहिल्यानगर) अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या साथीदाराचे नाव विचारले असता त्यांनी गणेश विजय लोमटे, रा.प्रेमदान हाडको, अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे त्यांनी गुन्हयात वापरलेली 90 हजार रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची विना क्रमांकाची मोपेड जप्त करण्यात आलेली आहे.

पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रविण राजु चांदणे याने त्याचे वरील दोन साथीदारासोबत मोपेड गाडीवर जाऊन सहा मे रोजी पहाटे एका इसमास आडवून गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयांचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post