कर्जत नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 32 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात...

कर्जत : कर्जत नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण२७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून १३जागेसाठी ३२उमेदवार रिंगणात आहेत.


यावेळी प्रभाग निहाय उमेदवारांच्या नांवे व पक्ष खालीलप्रमाणे:- प्रभाग क्रमांक २ जोगेश्वर वाडी- खरात लंकाबाई देविदास (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक ४ माळीगल्ली- गायकवाड अश्विनी सोमनाथ (भाजपा) सोनमाळी मनीषा सचिन (राष्ट्रवादी) क्षीरसागर आशाबाई बाळासाहेब (रा स प) प्रभाग ६(यासीननगर)तोटे मोनाली ओंकार (राष्ट्रीय काँग्रेस)क्षीरसागर गणेश नवनाथ(भाजपा)थोरात दिनेश बाळू (शिवसेना).

प्रभाग क्रमांक ८शाहूनगर- लाढाणे बबनराव सदाशिव (भाजपा) भाऊसाहेब सुधाकर (राष्ट्रीय काँग्रेस) प्रभाग क्रमांक९समर्थनगर-जपे उमेश शंकर (भाजपा) सोमनाथ हरी (वंचित) काळदाते अमृत श्रीधर (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक १०बेलेकर कॉलनी- गदादे मोनिका अनिल (भाजपा) राऊत उषा अक्षय (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक११बर्गेवाडी-पिसाळ मोहिनी दत्तात्रेय (भाजपा) नेटके ऐश्वर्या विजय (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक१२शहाजीनगर- मेहेत्रे शरद रामभाऊ (भाजपा) राऊत नामदेव चंद्रकांत (राष्ट्रवादी).

प्रभाग क्रमांक १३गोदड महाराज गल्ली- सुपेकर सुवर्णा रवींद्र (राष्ट्रवादी) शिंदे वनिता परशुराम भाजपा प्रभाग क्रमांक१४-सोनारगल्ली- सय्यद शिबा तारीख (भाजपा)कुलथे ताराबाई सुरेश (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक१५भवानीनगर- भैलुमे संजय शाहूराव (भाजपा) भैलुमे अनिल विश्वनाथ (वंचित)भैलूमे संतोष आप्पा (अपक्ष )भैलुमे भास्कर बाबासाहेब (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक १६अक्काबाई नगर- काकडे सुवर्णा विशाल (भाजपा) भैलुमे निर्मला दीपक (वंचित)भैलूमे प्रतिभा नंदकिशोर (राष्ट्रवादी).

प्रभाग क्रमांक १७भांडेवाडी- गदादे अनिल मारुती (भाजपा) आगम धनंजय दादासाहेब (अपक्ष) शेलार छाया सुनिल (राष्ट्रवादी) असे उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.१३जागेसाठी ३२उमेदवार रिंगणात असून उर्वरित चार प्रभागाची निवडणूक हे प्रभाग ना.मा. प्र.(OBC)असल्याने नुकत्याच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगिती आदेशाने प्रलंबित ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने  सांगितले आहे.

यात प्रभाग क्र.२जोगेश्वरवाडी प्रभागात ऐनवेळी नाट्यमय घडामोडी होऊन भाजपाच्या उमेदवार नीता अजिनाथ कचरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या उमेदवारावर दबाव निर्माण करून विरोधी पक्षाने अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा आरोप करून माजीमंत्री प्रा. राम शिंदे  आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रशासनातील अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक झाली.या नंतर माजीमंत्री प्रा.राम शिंदे आणि भाजपापदाधिकाऱ्यांनी श्री.संत गोदड महाराज मंदिरा समोर राम शिंदे यांनी मौनव्रत धारण करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

बिनविरोध बाबत सध्या निर्णय नाही.-निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले व सह्ययक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद जाधव 

प्रभाग दोन मध्ये लंकाबाई देवीदास खरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध झाल्याची चर्चा सुरू असताना या बाबत प्रशासनाने खरात यांच्या उमेदवारी अर्जावर न्यायालयात आक्षेप घेण्यात आला असल्याने त्यावर आता भाष्य करता येणार नाही. असे निवडणूक प्रशासनाने सांगितले आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी  प्रकाश वायचळ यांनी एकूण निवडणुकीचा आढावा घेऊन मुख्याधिकारी गोविंद जाधव,नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्यासह निवडणूक केंद्रांची पाहणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post