वाहनांची बेशिस्ती भोवणार... दंडात वाढीने खिशाला झळ बसणार...


नगर : वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून सुधारित दंड आकारणी करण्यात येणार आहे. याबाबतची महिती शहर वाहतूकं शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली. वाहनचालकांकडून पूर्वी पाचशे रूपये दंड आकारला जात असे. आता, सुधारित दंड आकारणीमुळे तो पाच हजार रूपये होणार आहे.

शासनाने मोटार वाहन अधिनियम २०१९ ची अंमलबजावणी करण्यासाइी अधिसूचना काढली आहे. त्यानुसार ई चलन प्रणालीमध्ये दंडाची रक्कम ११ डिसेंबर २०२१ रोजीच्या मध्यरात्रीपासून अद्यायावत करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक भोसले यांनी सांगितले. 

वाहनचालकांकडून नवीन दराने दंड आकारणी केली जाणार असून काही प्रकरणात न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत. दंड आकारणी टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे. 

नवीन दंड आकारणी पुढीलप्रमाणे- लायसन्सशिवाय वाहन चालविणे पुर्वी पाचशे रूपये दंड होता. तो आता पाच हजार रूपये झाला आहे. लर्निंग बोर्डशिवाय वाहन चालविणे पूर्वी दोनशे आणि आता पाचशे रूपये तसेच पुन्हा उल्लंघन झाल्यास १ हजार ५०० रूपये दंड आकारला जाणार आहे.

विना हेल्मेट, मोबाईलचा वापर, सिट बेल्टचा वापर न करण यासाठी प्रत्येकी पाचशे रूपये दंड, मोबाईल व सिट बेल्टचे पुन्हा उल्लंघन केल्यास प्रत्येकी १ हजार ५०० रूपये दंड तर हेल्मेट नियमाचे दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास लायसन्स ३ महिन्याकरीता अवैध, ट्रिपल सीटसाठी एक हजार रूपये व दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास ३ महिने लायसन्स अवैध, चुकीच्या पध्दतीने वाहन चालविल्यास न्यायालयात खटला, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे एक हजार रूपये, पुन्हा उल्लंघन केल्यास दोन हजार रूपये, पोलिस इशाऱ्याचे पालन न केल्यास पाचशे रूपये दंड, दुसऱ्यांदा एक हजार पाचशे रूपये, ब्लॅक फिल्म पाचशे रूपये दंड, पुन्हा उल्लंघन केल्यास १ हजार ५०० रूपये दंड, माद्रक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविल्यास न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post