फिर्यादी अन्‌ संबंधितांचे कॉल रेकॉर्ड तपासा... जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी

नगर  ः तोफखाना पोलिस ठाण्यात गोविंद मोकाटे यांच्यावर झालेला गुन्ह्याची संपूर्ण पडताळणी करावी. फिर्यादी आणि मदत करणाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड, व्हाट्‌सअप चॅटिंग, मेसेजची तपासणी करावी, अशी मागणी मोकाटे यांच्या पत्नी मीना मोकाटे व भाऊ सुंदर मोकाटे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, नगर माजी पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बायजाबाई जेऊर गटातून प्रबळ उमेदवार होते. त्यांच्यावर डिसेंबरला तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी, फिर्यादीचे पती आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या संबंधितांचे मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड, मेसेज तपासणे गरजेचे आहे. फिर्यादीचे व्हाट्‌सअप चॅटिंग, फेसबुक अकाउंट, मेसेंजर, टेक्‍स्ट मेसेज व कॉलची तपासणी करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

फिर्यादीने दाखल केलेल्या गुन्ह्यातील तारखेच्या दिवशी गोविंद मोकाटे यांचे मोबाईलचे लोकेशन तसेच फिर्यादीचे मोबाईल लोकेशन तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. 

या प्रकरणातून मोकाटे कुटुंबाची बदनामी काही व्यक्‍ती जाणीवपूर्वक करत आहेत. फिर्यादी आणि तिला मदत करणाऱ्या काही व्यक्‍तींपासून लोकांपासून आमच्या कुटुंबाला आमच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदनासमवेत काही फोटो आणि लग्न समारंभाचे व्हिडिओ दिले आहेत. 

मोकाटे यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराचे घरगुती समारंभाचे असल्याचा दावा केला आहे. हे समारंभ  चार डिसेंबरला झाल्याचा दावा केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post