अहो.ऐकले का... पेट्रोल स्वस्त होणार...

नवी दिल्ली : विश्वास नाही बसणार पण खरं आहे.... लवकरच पेट्रोलच्या भावात घसरण होणार आहे. यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळणार आहे. कितीने स्वस्त होणार हे स्पष्ट नसले तरी लवकरच दर नियंत्रणात येण्याची शक्यता.आहे.


पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून वरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. 

इबीपी प्रोग्राम अंतर्गत, इथेनॉल पेट्रोलमध्ये  जाते. पेट्रोल आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

केंद्र सरकारने 2018 मध्ये पहिल्यांदा इथेनॉल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर आधारित इथेनॉलचे दर निश्चित केले होते. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. 

सरकारने गेल्या महिन्यात उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या किमती पेट्रोलमध्ये 1.47 रुपयांनी वाढवल्या होत्या. 

पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिसळल्याने प्रदूषणही कमी होते आणि शेतकऱ्यांना वेगळे उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मिळतो, असे सरकारचे म्हणणे आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post