संस्थेच्या उन्नतीसाठी निवडणुकीच्या आखाड्यात...

नगर : स्वच्छ व सुंदर पारदर्शी कारभार करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचविण्याचा ध्येय डोळ्यासमोर ठेऊनच निवडणुकीच्या आखाड्यात श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनल उतरला आहे. सभासदांचे हिता कारभार करून संस्थेला उन्नतीत भर पाडण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती श्रीपावन गणेश मंगलमूर्ती पॅनलचे प्रमुख सुभाष कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


या पत्रकार परिषदेला पॅनल प्रमुख आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर डिसले, शिवाजी भिटे, विकास साळुंके, शशिकांत रासकर, आबासाहेब घोडके, नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वंदना धनवटे, डॉ. सुरेश ढवळे, बाळासाहेब यादव, विलास वाळूंज, सोपान हरदास, संतोष कोळगे, किरण खेसम्हासळकर, रमेश जावळे, अशोक लिंगडे, योगेश राळेभात, गीतांजली कोरडे, महेंद्र आंधळे, रमेश औटी, नारायण बोराडे, आशा घोडके, विद्या निराळी आदी उपस्थित होते.

कराळे म्हणाले की, पतसंस्थेतील सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला सभासद कंटाळलेले आहे. २००३ ते २०१४ पर्यंत आमच्या पॅनलने बॅंकेत सत्तेच्या माध्यमातून अनेक विधायक कामे केलेली आहेत. अनेक संकटांना सामोरे जावे लागलेले आहे. 

२००३ ते २००४ला कर्जावरील व्याजदर १५ ते १६ टक्के होता. तो आम्ही २०१४ अखेरपर्यंत १२ टक्‍कयांवर आणला होता. पूर्वी ३६ लाखाच्या ठेवी होत्या. त्या आजपावेतो ९० कोटीपर्यंत गेलेल्या आहेत. या सर्व बाबी सभासदांची विश्‍वासहर्ता व पारदर्शी कारभारामुळेच झालेले आहे. 

आज संस्थेची शहरात सुसज्य वास्तू उभी असून त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडत आहे. सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी आयत्या पिढावर रेघोट्या ओढल्या आहेत. त्यांनी सभासद हिताच्या दृष्टीने कोणतेही काम केलेले नाही, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post