पारनेरात कांद्याला विक्रमी भाव...


पारनेर ः पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले.गावरान कांद्याची सुमारे 24 हजार 679 कांदा गोण्यांची आवक झाली.  कांद्याला 3000 ते 3400 रुपयांचा भाव ठरावीक वक्कलाच मिळाला. गावरान कांद्याला 3100 रुपयांचा तर लाल कांद्याला सर्वाधिक 3000 रुपयांचा मिळाला.

पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याच्या 24 हजार 679 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 3100 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.

कांद्याचे प्रतवारीनुसार बाजार भाव : एक नंबर कांदा : 2500 ते 3100, दोन नंबर कांदा : 2100  ते  2400 तीन नंबर कांदा : 1600  ते 2000, चार नंबर कांदा : 1000 ते 1500.

पारनेर बाजार समितीत लाल कांद्याची आवक सुरु झाली आहे. लाल कांद्याला आज 3000 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. बाजार समितीत चांगली नवीन कांदा गोण्यांची आवक होऊन कमीत कमी 500 व जास्तीत जास्त 3000 रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला.

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्री आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post