निघोज ग्रामपंचात विकासकामांचा शुभारंभ व झालेल्या विकासकामांचा लोकार्पण कार्यक्रम

पारनेर :  निघोज ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने 15 वा वित्तआयोग अंतर्गत कुंडरोड लंकेवस्ती पाईप गटार करणे-9.75 लक्ष या योजनेचा विकासकामांचा शुभारंभ तसेच निघोज गावांतर्गत पाईप गटार 7.25  लक्ष या झालेल्या विकासकामांचा लोकार्पण कार्यक्रम मंगळवार दि.२१ रोजी सकाळी 9:30 वाजता होणार आहे, या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे यांनी केले आहे.


हिंदवी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्यक्षम विश्वस्त शिवाजीराव वराळ साहेब यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यावेळी  तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजीराव पिंपरकर सर, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक बाळासाहेब निचीत, कांदा व्यापारी व वडनेर सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव वाजे, जय मल्हार मंडळाचे मार्गदर्शक शंकरराव आबाजी लंके पाटील, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त, कोष्टी समाज मंडळाचे अध्यक्ष बबनराव ससाणे, मुस्लिम समाजातील ज्येष्ठ ग्रामस्थ हाजी इस्माइल भाई सय्यद, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व अल्पसंख्याक समाजाचे नेते संतोषशेठ ईधाटे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. 

ग्रामस्थांनी या विकासकामांचा लोकार्पण व भुमीपूजन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चार नंबर प्रभाग मधील ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ पाटील, ग्रामपंचायत सदस्या शबनूर अस्लमभाई इनामदार, ग्रामपंचायत सदस्या भावना सतिष साळवे, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post