पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे.
आरोग्य विभाग, म्हाडा तसेच शिक्षक भरती परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आतापर्यंत टीईटी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांच्या साखळीतील अटक केलेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून गांभिर्याने सुरु आहे. त्यानुसार डेरे याला अटक करण्यात आली.
Post a Comment