मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या विश्वस्त निवडीमध्ये योग्य व्यक्तींना न्याय देणार...

निघोज : मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या आगामी पाच वर्षांसाठी होणाऱ्या विश्वस्त निवडीमध्ये योग्य व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकशेठ कवाद यांनी दिली आहे.


ट्रस्टची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कवाद यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

सभेच्या प्रारंभी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकशेठ कवाद,उपकार्याध्यक्ष शांताराम मामा लंके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून मळगंगा देवीच्या तसेच ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्व.बाबासाहेब कवाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यांनी अहवाल वाचन केले.सर्व विषय उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले.आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघातील स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी निघोज येथे एक कोटीची अभ्यासिका दिल्याबद्दल तसेच ५ कोटीची विकासकामे लवकरच पुर्णत्वास येणार असल्याने या वार्षिक सभेत आमदार लंके यांच्या अभिनंदनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर केला. 

यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, फौंडेशनचे मार्गदर्शक सुनिल पवार व माजी उपसरपंच उमेश सोनवणे यांनी आगामी पाच वर्षाकरीता होणाऱ्या विश्वस्त मंडळाच्या निवडीचा निकष गटातटाचे राजकारण न करता राजकारण विरहित देवीची वर्षानुवर्षे सेवा करणाऱ्या भावीकांना विश्वस्त म्हणून संधी देण्यात यावी तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील मळगंगा देवीच्या कलशारोहण कार्यक्रमाचे नियोजन करताना ग्रामस्थांना विश्वासात घेण्याची सूचना केली. 

यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, ठकाराम लंके, नानासाहेब लंके,शिवा लंके, अनंतराव वरखडे, दिलीप ढवण, अनिल लंके, रुपेश ढवण,दत्ता लंके, आदिंनी विविध सूचना केल्या. यावेळी सहसचिव रामदास वरखडे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानूशेठ लंके, संघटक ॲड. बाळासाहेब लामखडे, विश्वस्त बबनराव ढवण, शिवाजीराव वराळ, अमृता रसाळ, शंकरराव लामखडे, कॅप्टन विठ्ठलराव वराळ, काळुराम गजरे,रमेश ढवळे, बबनराव ससाणे, दत्तात्रय लाळगे, दत्तात्रय भुकन, बबनराव तनपुरे, मंगेश लंके, विश्वास शेटे, वसंत कवाद आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.वार्षीक सर्वसाधारण सभेसाठी ट्रस्टचे व्यवस्थापक महेश ढवळे, उपव्यस्थापक रोहन उनवणे, ज्येष्ठ लेखणीक बाळासाहेब साळवे,अशोक वराळ , अनिता साळवे आदिंनी परिश्रम घेतले.

ट्रस्टच्या वार्षिक सभेत विश्वस्त निवड, विकासकामे यांची चर्चा झाली मात्र कर्मचाऱ्यांना गेली दोन वर्षांपासून पगारवाढ करण्यात आली नाही. 

ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्व.बाबासाहेब कवाद हे प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांची आवर्जून चौकशी करून दरवर्षी कर्मचाऱ्यांना पगार वाढ करीत होते. स्व.कवाद यांच्याच कार्याचे अनुकरण करीत विश्वस्त मंडळाने कर्मचाऱ्यांना पगारवाढ करावी अशी अपेक्षा सभासदांनी बोलताना व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post