बाधितांची आकडेवारी घटली तरी चिंता कायम...

नगर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी नागरिकांमध्ये चिंता कायम आहे. दिवसभरात फक्त 16 बाधित आढळले आहेत.


आज 48 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 271 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.89 टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 16 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 410 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 02, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 09 आणि अँटीजेन चाचणीत 05 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून रुग्णामध्ये अकोले 01 आणि श्रीगोंदा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post