पुणे : मनसेच्या धडाकेबाज महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर उद्या पुण्यात येत आहे. पण, त्याआधीच पाटील यांनी पक्ष सोडला आहे.
मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून नावलौकिक असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे.
'मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे.
आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि "श्री.राज ठाकरे" हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल' अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.
पक्षांतर्गत असलेल्या वादामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. आता राज ठाकरे पुण्याच्या दौर्यावर आहेत. त्यामुळे ते पक्षातील अंतर्गत संघर्ष कसा सोडवतात, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Post a Comment