अमर छत्तीसे
श्रीगोंदा : कुकडी कारखान्याच्या सभासदांना न्याय देण्यासाठी व त्यांच्यावर होणारा अन्याय कायमचा घालविण्याठी 'कुकडी' सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सर्व समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र घेत पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी स्पष्ट केले.
काष्टी येथे सहकार महर्षी कुंडलीकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना निवडणुकी संदर्भात आमदार बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तालुक्यातील येळपणे, कोळगाव व मांडवगण हे तीन जिल्हा परिषद गट येतात यामध्ये कुकडीचे हिंगणी, राजापुर, एरंडोली, पिपंळगाव पिसा, कोळगाव, भानगाव या सहा गटातून पंधरा उमेदवार उभे करुन इतर पाच असे एकूण वीस उमेदवार साखर कारखान्यात पाठविण्यासाठी १२ हजार २५० मतदारामधून निवडून द्यायचे आहेत.
आमदार पाचपुते म्हणाले कुकडी साखर कारखान्याच्या उभारणीपासून सामान्य शेतकऱ्यांना आपला ऊस गाळप करण्यासाठी मोठ्या अडचणी आल्या.
या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. काही वेळा आपण त्यांना सहकार्याची भूमिका घेऊन मदत केली. जवळचे कार्यकर्ते नाराज केले. परंतु त्यांच्या कामात सुधारणा झाली नाही. म्हणून जास्तीत जास्त सभासदांनी कुकडीसाठी उमेदवारी फाॕर्म भरावेत.
आपल्यातील चांगल्या होतकरु कार्यकत्याला उमेदवारी देवून कारखान्यात काम करण्याची संधी देणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुकडी साखर कारखाना निवडणूक सर्वाना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे आव्हान आ.पाचपुते यांनी केले.
यावेळी भगवानराव पाचपुते, दत्तात्रय पानसरे, दिनकर पंधरकर, बाळासाहेब नहाटा, साजन पाचपुते, बाबासाहेब सरोदे, पुरुषोत्तम लगड, दादासाहेब वाखारे, कुशाबा धावडे बंडू पंधरकर,दादासाहेब ईश्वरे, अॕड.बाळासाहेब पवार, डाॕ.दादाराजे गिरमकर, नितिन नलगे, रामदास इधाटे,उमेश घेगडे,सोमनाथ खेडकर,बाळासाहेब पठारे,बबन दिवेकर, अशोक इंगवले, मधूकर लगड, वनराज तिखोले, दत्तात्रय डांगे,संजय शेळके, प्रदिप इधाटे,प्रमोद जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर राहून कुकडी निवडणूक जिंकायाची असा निर्धार करुण आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन भाजपा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी केले तर बाळासाहेब महाडिक यांनी आभार मानले.
आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कुकडी साखर कारखाना निवडणूक पूर्ण ताकदीने लढवून जिंकण्यासाठी स्व. सदाअण्णा पाचपुते यांच्या जागी आता पॕनलचे युवा नेतृत्व साजन शुगरचे अध्यक्ष साजन सदाशिव पाचपुते, यांच्यासह दत्ता पानसरे, दिनुकाका पंधरकर, कुशाबा धावडे, भैय्या लगड, यांच्यासह तरुणांकडे जबाबदारी येत असल्यामुळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने निवडणूक लढायला तयार होत आहेत.
Post a Comment