नागवडे कारखाना निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार सर्वच नेते लागले कामाला...पण बिगर सभासदांची लुडबूड वाढली...

अमर छत्तीसे

श्रीगोंदा : सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहिर झाली. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पण दरम्यान च्या काळात मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील नेत्यांची बैठक घेऊन खडे बोल सुनावले. 


सगळीच यंत्रणा राजेंद्र नागवडे यांच्या प्रचारात उतरून आम्ही बरोबर असल्याचे दाखवतात. पण या घडामोडीत बिगरसभासद मंडळींची लुडबुड वाढल्याचे दिसून येत आहे. 

नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता लागली. पण याची नांदी मागील वर्षी पासून सुरू झाली आहे. या निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांना स्वकीयांचा सामना करावा लागत आहे. कारण माजी उपाध्यक्ष मगर हे स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते.


पण आता त्यांनीच राजेंद्र नागवडे यांच्या पुढे आव्हान उभे केले आहे त्यांना काही लोकांची मदत भेटली त्यामुळे दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील प्रमुखांची बैठक घेऊन सर्वांनी एकदिलाने काम करण्याच्या आपल्या स्टाईलमध्ये सूचना दिल्या आहेत. 

आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व हजर होते. पण यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे जे नागवडे कारखाना चे सभासद नाहीत मतदार नाहित अशा स्वयंभु कार्यकर्त्यांची लुडबुड दिसून आली.

दरम्यान आज राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांची मगर यांनी भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर झळकत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post