नव्याने 44 बाधित आढळले...

नगर : जिल्ह्यात आज 48 रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 50 हजार 589 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.90 टक्के इतके झाले आहे. 


आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 44 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 375 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 06, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 28 आणि अँटीजेन चाचणीत 10 रुग्ण बाधीत आढळले.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 05, जामखेड 01, कोपरगाव 01, नगर ग्रा 02, नेवासा 07, पारनेर 05, पाथर्डी 01, रहाता 07, राहुरी 03, संगमनेर 06, शेवगांव 05, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 01 आणि इतर जिल्हा  01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post