भिंगारमध्ये सुगंधी तंबाखू विक्रेत्यावर कारवाई...

नगर ः भिंगारमध्ये सुंगधी तंबाखू या अगोदरही अनेकदा पकडण्यात आलेली आहे. आज पुन्हा याच परिसरात सुगंधी तंबाखू पकडण्यात आलेली आहे. तंबाखूसह एकास पोलिसांनी अटक केली आहे.


भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमी मिळाली की , भिंगार बाजारच्या पाठीमागे आर्मी रस्त्या लगतच काचचे गोडवाऊनच्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी तंबाखुची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करुन ठेवली आहे, अशी माहिती मिळाली. 

त्यानंतर  कटके यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते  यांच्या पथकाने छापा टाकला. साजित हमीद पठाण (वय ४२ वर्षे रा . झेंडीगेट, नालसाब चौक, अहमदनगर) यास चौकशीसाठी ताब्यात घेऊन झडती घेतली असता सुगंधी तंबाखु मिळुन आली एकूण 27 हजार 520 रुपयांचा पोहेकॉ जालिंदर आव्हाड यांनी जप्त मुद्देमाल व आरोपींना ताब्यात घेण्यात आले. 

ही  कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील,अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश मोरे,पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते या पथकाने कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post