कोरोना बाधितांचा आकडा घटला...

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने घट होत आहे. काल दिवसभरात देशात 11 हजार 499 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 255 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 21 हजार 888 एवढी कमी झाली आहे. 

त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 13 हजार 481 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 70 हजार 482 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे सुमारे 177 कोटी डोस देण्यात आले आहेत. तर काल दिवसभरात 28 लाख 29 हजार 582 डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत 177 कोटी 17 लाख 68 हजार 379 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1.98 कोटी पेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. 

देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post