आमदार रोहित पवार यांच्या विजयी घौडदौडला ब्रेक

जामखेड : विधान सभा निवडणुकीनंतर सर्वच निवडणुकांमध्ये आमदार रोहित पवार यांची विजयी घौडदौड सुरु होती. ही घौडदौड. आता भाजपाने रोखण्यास सुरवात केली आहे. सहकारातील घौडदौडीला भाजपाने नान्नजमध्ये ब्रेक लावला आहे. 


नान्नज (ता. जामखेड) सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे तुषार पवार यांच्या जनसेवा पॅनेलने सर्व तेरा जागा जिंकत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले व राष्ट्रवादीचे माजी सरपंच संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या शेतकरी विकास पॅनलचा पराभव केला. 

रत्नापूर, अरणगाव, झिक्री सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकत सहकार क्षेत्रात आमदार रोहित पवार यांनी दमदार पदार्पण केले होते. परंतु, बाजार समितीचे संचालक तुषार पवार, सरपंच महेंद्र मोहळकर, भाजपचे उदय पवार यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या नान्नज सेवा सोसायटीत भाजपच्या जनसेवा पॅनेलने सर्व तेराजागा जिंकत सत्ता अबाधित ठेवली आहे. 

शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मतमोजणी झाली. या सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत प्रत्यक्ष १ हजार ४२८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. 

त्यापैकी ६५ मते अवैध झाली. निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी दे. अ. घोडेचोर, सहायक निबंधक लिपिक नीलेश मुंढे, सोसायटीचे सचिव सत्तार, जवळ्याचे सचिव सुरेश लेकुरवाळे यांनी पाहिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post