मावळ : नवाब मलिक यांनी एनसीबीची पोलखोल केली म्हणून त्यांना गोवण्यात आलं, त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला आहे. पण महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकणार नाही, महाराष्ट्रातील सरकार यांच्या डोळ्यात खूपत आहे' अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद अभियान आणि मावळ विधानसभा आढावा बैठकीला मावळातील तळेगांव दाभाडे येथे पार पडली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भाजपवर निशाणा साधला.
यावेळी मावळ लोणावळा,वडगांव, देहूरोड, तळेगांव येथील भाजप युवा मोर्चा माजी अध्यक्ष मुकेश परमार यांच्यासह मावळ तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यानी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ईडीने नवाब मलिक यांना 15 मिनिट दिली असती तर सर्व कागदपत्र दिले असते, सरकारच्याविरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दाऊद च्या नावावर मलिक यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. शरद पवार यांच देखील असंच झालं होतं, सुडाच राजकारण सुरू आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
महाराष्ट्राच्या सरकारबद्दल गैरसमज करण्याचं काम केलं जातं आहे. दाऊद चा संबंध जोडला जात आहे. दिल्लीत नेहमी कपट कारस्थाने केली. तरी महाराष्ट्र कधी झुकणार नाही. महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केेले.
काही हाती लागत नाही म्हणून मंत्र्यांच्या घरावर धाडी टाकण्याचे काम दिल्लीतून सुरू केलंे आहे. नार्कोटिक्स मधील नवाब मलिक यांनी काही गोष्टी बाहेर काढल्या. त्यामुळे नवाब मलिकांना गोवण्यात आले, असा आरोपच पाटील यांनी केला.
Post a Comment