राहुरी : शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशिय संस्था नाशिकतर्फे येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या करपे यांना राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशिय संस्था नाशिकतर्फे आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय, उद्योग व आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून देण्यात येतो.
यंदाच्या वर्षीचा राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कारविद्या करपे यांना प्रदान करण्यात आला आहे. या वेळी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अशोक राणा, वीरमाता निलाताई कौतिक आमले, माजी पालकमंत्री आप्पासाहेब तथा गुलाबराव देवकर, महापौर जयश्री सुनिल महाजन महापौर, ज्येष्ठ पत्रकार विकास भदाणे आदी उपस्थित होते.
हा पुरस्कार जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात प्रदान करण्यात आला.
Post a Comment