मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. एका महिलेबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा महिला आयोगाला अहवाल सादर झाल्यानंतर रात्री बारा वाजता मालवणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालात त्या महिलेचा शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच ती गरोदर नव्हती असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी महिला आयोगाला यासंदर्भात अहवाल दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात लाखोंच्या संख्येने निर्माण करण्यात आलेल्या बोगस ट्विटर हॅण्डलची देखील चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राणे यांनी वारंवार त्या महिलेची बदनामी केली आहे.
Post a Comment