पारनेरच्या उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लसीकरण

पारनेर : पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे पारनेर नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुरेखा अर्जुन भालेकर तसेच नगरसेविका डॉ. विद्या बाळासाहेब कावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  बालकांना  हस्ते पोलीओ लसीकरण करण्यात आले.


सन 1995 पूर्वी भारतामध्ये पोलिओचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने भारत सरकारने पोलिओ निर्मूलन करण्यासाठी देशव्यापी अभियान चालू करत पाच वर्षातील बालकांना पोलिओ ढोस देण्याची आहे सुरू केले. 

त्याला प्रतिसादही चांगला मिळाला 2015 नंतर देशात पोलिओ आजार पूर्णपणे संपुष्टात आला .परंतु आरोग्य मंत्रालय भारत सरकारचे दो बूँद जिंदगी के या शीर्षकाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबविला जातो.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिओ लसीकरण मोहिम पारनेर येथे अनेक ठिकाणी नियोजनबद्ध रित्या राबवले गेले आहे. 

रविवारी पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे पारनेर नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुरेखा अर्जुन भालेकर तसेच नगरसेविका डॉ. विद्या बाळासाहेब कावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  बालकांना  हस्ते पोलीओ लसीकरण करून मोहिमेस सुरवात करण्यात आली.


आरोग्य विभागाला सहकार्य करण्यासाठी O ते 5 वर्षाच्या आतील  बालकाला या पोलिओची बाधा होत असते. त्याचा प्रादुर्भाव तीन वर्षा पर्यंतच्या बालकांमध्ये जास्त पाहावयास मिळतो. तेव्हा सदर बालकांच्या पालकांनी हा पोलीओ ढोस आपल्या पाल्यांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन उपनगराध्यक्षा भालेकर यांनी केले.

गेले तीन ते चार वर्षात भारत सरकारच्या या उपक्रमाला संपूर्ण देशभरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेल्या चार वर्षात एकही नवीन रुग्ण आढळला नाही परंतु यापुढील काळात तो आढळणारा नाही त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग अहमदनगर यांनी राबवलेली मोहीमेस सहकार्य करावे असे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कावरे यांनी आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शना खाली प्रत्येक आरोग्याच्या अभियानात सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हिरारीने सहभाग नोंदवत आपापल्या गावातील वय वर्षे झिरो ते पाच मधील सर्व बालकांना पोलिओ डोस देऊन युवा पिढी सक्षम समृद्ध व आरोग्यमय बनवावी असे आवाहन केले .

भारत देश हा पूर्णपणे पोलिओमुक्त झाला असून तसे घाबरण्याचे कारण नसले तरी इतर काही देशांमध्ये अजूनही पोलिओचे रुग्ण आढळत आहेत. तेव्हा या पोलीओचा समुळ नाश करण्यासाठी प्रत्येक पालकांनी जबाबदारीने आपल्या पालकांना पोलिओची दोन थेंब देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे नगराध्यक्ष डॉ. विद्या कावरे यांनी सांगितले.

यावेळी या पल्स पोलिओ अभियानासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे , ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर तांबे ,डॉक्टर् विद्या कावरे , डॉक्टर बाळासाहेब कावरे यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या सह सुरेश बोरुडे , विजय तराळ , श्रीकांत चौरे, तांबे मामा , संकेत भालेकर यांच्यासह अनेक पालक या वेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post